महाराष्ट्रलातूरसामाजिक

बागवान सोशल फाउंडेशन तर्फे अपंग बांधवास मोफत तीन चाकी सायकल भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क

लातूर : बागवान सोशल फौंडेशन बार्शी यांच्या तर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून लातूर येथे अहमदपूर येथील गुलाब पठाण या गरीब अपंग बांधवास मोफत विकलांग ट्राय सायकल भेट देण्यात आली या प्रसंगी रुग्ण हक्क संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुडी, बागवान सोशल फौंडेशन बार्शी संस्थापक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते अपंग बांधवास शाल, कपडे,फळे पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने विकलांग ट्राय सायकल भेट देण्यात आली.

सदर सामाजिक उपक्रम राबविले बद्दल रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने जुबेर बागवान यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेचे अध्यक्ष हणमंत गोत्राळ, जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण साळुंके, संदीपान मोरे,संतोष घोगरे, तानाजी शिंदे, तुकाराम पवार, अहमद शेख, सुनिल वाघमारे, अश्रुबा, अँड धंनजय मस्के, अँड नितीन सौदागर, दत्ता होळकर, राजू बंडे, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button