वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृताच्या वारसास व जखमी व्यक्तींना अर्थसाह्याचे धनादेश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जिवीत हानी झालेल्या व्यक्तीच्या वारसास व जखमी झालेल्या व्यक्तीस व नातेवाईकास आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते अर्थसाहयाचे धनादेश वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे , सहा.वनसंरक्षक, वन विभाग गंगाधर प्रकाशराव ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.आर. चव्हाण आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात पुढील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. कै. मोतीराम रंगनाथ गिराम (रानडुकराच्या हल्यात मृत्यु) रा. निपाणी टाकळी ता. सेलु जि. परभणी यांचे वारसदार रामप्रसाद मोतीराम गिराम यांना रक्कम रु. २५.०० लक्ष धनादेश देण्यात आला. दिगंबर मारोती हेंडगे, रा. कातनेश्वर, ता. पुर्णा जि. परभणी (रानडुकराच्या हल्यात गंभीर जखमी ) रु 5.00 लक्ष धनादेश देण्यात आला . द्वारकाबाई दिंगाबर तिडके रा. पोरवड, ता. जि. परभणी (रानडुकराच्या हल्यात गंभीर जखमी ) रु.5.00 लक्ष धनादेश देण्यात आला.