नवी मुंबईमहाराष्ट्र

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने जागतिक स्तरावरील विद्वान अर्थतज्ज्ञ हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मितभाषी व्यक्तिमत्व होते.देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याची त्यांची क्षमता होती हे त्यांनी पी ची नरसिंह राव पंतप्रधान असताना दाखवून दीले होते.त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती.त्यांच्या निधनाने भारत देशाची मोठी हानी झाली आहे.देशाने एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ विद्वान गमावला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.उद्या सकाळी दि.27 डिसेंबर रोजी दिल्लीत दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहण्यासाठी ना. रामदास आठवले दिल्लीला रवाना होणार आहेत.

काँग्रेस नेते माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्याशी यूपीए च्या काळात माझे चांगले जवळचे संबंध होते.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग 10 वर्षे पंतप्रधान म्हणून डॉ मनमोहन सिंग यांनी काम केले.त्यापूर्वी त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून चांगले काम केले. पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून ही त्यांनी काम केले होते 2004 साली त्यांना काँग्रेस ने यूपीए सरकार मध्ये पंतप्रधान पदाची बहुमान दिला.त्यानंतर सलग 10 वर्ष त्यांनी पंतप्रधान म्हणून देशसेवा केली मी यूपीए चा त्याकाळात मेंबर होते.तेंव्हा मी नेहमी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटत होतो त्यांच्या शी माझे चांगले संबंध होते मी केंद्रात मंत्री झाल्यानंतर माझ्या घरी त्यांनी एकदा स्नेहभावनेने. सदिच्छा भेट दिली होती.त्यांचा शांत विनम्र स्वभाव आणि अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची विद्वत्तेचा अमीट ठसा भारतीय राजकारणावर कायम राहील अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button