न्याय विभागबार्शीमहाराष्ट्र

अवैद्य अफू व गांजाची खरेदी – विक्री करण्याचा आरोप असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील वैराग पोलिस स्टेशन येथे फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल हरीश मधुकर थोरात लोकल क्राईम ब्रँच सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अवैद्य अफू आणि गांजाची खरेदी – विक्री केलेबाबत गु.र.नं.३८२/२०२५ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे एनडीपीएस कलम ८(क),१७(क),२९ नुसार आरोपी नामे प्रमोद आप्पा मोरे वय-५० वर्षे रा.सातारा या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक माहिती अशी की, सोलापूर येथील लोकल क्राईम ब्रँचचे अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,वर नमूद इसम हे वैराग येथे अफूची अवैद्य खरेदी-विक्री करीत आहेत.त्यानंतर दि.१९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५० वा. सुमारास वैराग येथील विद्या मंदिर हायस्कुलच्या परिसरात आरोपी प्रमोद मोरे व यशवंत सौदागर जगताप या दोघांनी खरेदी-विक्रीकरीता घेवून आलेला अवैध अफूची पिशवी व गांजाचे पोते या मादक व नशाकारक अंमलीपदार्थ स्वतःच्या ताब्यात बाळगलेल्या स्थितीत मिळून आल्याने दोन्ही आरोपीस अटक करून वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावेळी आरोपीच्यावतीने अ‍ॅड. विवेक गजशिव यांनी आरोपीचे कामकाज पाहणेकामी जामीन अर्ज दाखल केला होता.सदरच्या जामीन अर्जावर झालेल्या युक्तीवादावेळी आरोपीच्यावतीने अ‍ॅड. विवेक गजशिव यांनी मा. न्यायालयाच्या समोर आरोपीची बाजू मांडून जोरदार युक्तिवाद केला. अ‍ॅड. विवेक गजशिव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. मलकापट्टे-रेड्डी साहेब यांनी आरोपी प्रमोद आप्पा मोरे याचा जामीन अर्ज मंजूर केला.याकामी आरोपीतर्फे अ‍ॅड. विवेक गजशिव, ॲड श्रीराम काशीद यांनी कामकाज पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button