मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शीत ७३८ बाटल्या रक्ताचे संकलन

0

आमदार राजेंद्र राऊत व ॲड. रणवीर राऊत यांनी स्वतः केले रक्तदान; रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. २३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, बार्शी शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून तब्बल ७३८ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले. बार्शी येथील भगवंत रक्तपेढीच्या माध्यमातून हे रक्त संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रणवीर राजेंद्र राऊत यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवक-युवतींसह विविध स्तरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.500यावेळी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरातून ७३८ बाटल्या रक्ताचे संकलन झाले आहे. एका बाटली रक्तातून तीन रुग्णांना मदत होऊ शकते. त्यामुळे या उपक्रमातून दोन हजारांहून अधिक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे. भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः ॲड. रणवीर राऊत यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. बार्शीकरांनी दिलेला प्रतिसाद समाजसेवेची प्रेरणा देणारा आहे. रक्तदान हीच खरी समाजसेवा असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”500ॲड. रणवीर राऊत यांनी सांगितले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला. युवक-युवतींनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ७३८ बाटल्या रक्त संकलनाचा उल्लेखनीय टप्पा गाठता आला. हा केवळ आकडा नसून दोन हजारांहून अधिक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारा उपक्रम आहे. बार्शीतील तरुणांनी एका हाकेवर मोठ्या संख्येने रक्तदान करून युवाशक्तीची ताकद दाखवून दिली.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बार्शी शहर व तालुका येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भगवंत रक्तपेढी, बार्शी, सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी, सोलापूर, रामभाई शहा रक्तपेढी, बार्शी आणि हेडगेवार रक्तपेढी, सोलापूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या