पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत १५ नोव्हेंबरला ‘शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ वितरण सोहळा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा बार्शी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह, बार्शी येथे संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे यंदा एकोणिसावे वर्ष आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरी, पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे हे भूषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व गीतकार प्रवीण दवणे (ठाणे) उपस्थित राहणार आहेत.500
यंदाच्या पुरस्कारांमध्ये गद्य विभागात मनोहर मंडवाले (कल्याण) यांच्या ‘ससर’ या कादंबरीला, तर रावसाहेब पुजारी (शिरोळ) यांच्या ‘कातरबोणं’ या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्य विभागात अरविंद भामरे (शिरपूर, जि. धुळे) यांच्या ‘शापित कोलाहलांच्या नोंदी’ या काव्यसंग्रहाला, वर्षा चोबे (पुणे) यांच्या ‘उसवलेलं शिवता येईल का?’ या काव्यसंग्रहाला तसेच डॉ. सविता शेट्टी (गडहिंग्लज) यांच्या ‘सारे काही तुझ्याचसाठी’ या काव्यसंग्रहाला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रसिद्ध उद्योजक तथा मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष काका ठोंबरे आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तुद यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
500
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ कवी प्रकाश गव्हाणे यांच्या ‘हा खेळ सारा स्वार्थाचा’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, साहित्यिक संवाद आणि पुस्तक प्रकाशन अशा विविधांगी कार्यक्रमाने हा सोहळा रंगणार आहे. बार्शीकर साहित्यप्रेमी, वाचक, कवी, लेखक आणि रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पां. न. निपाणीकर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रविराज फुरडे, प्रमुख कार्यवाह प्रकाश गव्हाणे आणि कोषाध्यक्ष बी. आर. देशमुख यांनी केले आहे.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button