महाराष्ट्रसोलापूर

रेड्डे येथील माने कुटुंबीयांसोबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी साजरी केली

दिवाळीशेतकऱ्यांच्या घरी भेट देत दुष्काळी परिस्थितीची घेतली माहिती; फराळ, आहेर व लहान मुलांना कपड्यांचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या अनुषंगाने ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे येथील शेतकरी माने कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन दिवाळी साजरी केली. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये, शासन ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.500
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी माने कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची तसेच दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती जाणून घेतली. कुटुंबातील कर्ते पुरुष बंडू भुजा माने हे ऊसतोड कामगार म्हणून कामासाठी बाहेरगावी गेल्याचे त्यांना समजले. त्यानंतर गोविंद भुजा माने तसेच बंडू भुजा माने यांच्या कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला.
दिवाळी सणानिमित्त माने कुटुंबीयांना फराळ व आहेर भेट देण्यात आली. तसेच घरातील लहान मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
500पालकमंत्री गोरे यांनी मुलांशी संवाद साधत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पालकमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केल्याने माने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button