छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रसण

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भिलपुरीत शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी; अंबादास तांगडे यांच्या मुलीच्या शिक्षणासह विवाहाची जबाबदारी स्वीकारली

B1न्यूज मराठी नेटवर्क500

जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून, त्यांना आवश्यक ती सर्व मदत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाईल. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना तालुक्यातील भिलपुरी येथे दिली.

जालना तालुक्यातील भिलपुरी येथील दुष्काळग्रस्त शेतकरी अंबादास तांगडे यांच्या घरी भेट देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी तांगडे कुटुंबीयांशी संवाद साधत शेतीची परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी कुटुंबासोबत पारंपरिक बेसन, बाजरीची भाकरी, गावरान ठेचा आणि चटणी अशा ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेतला.500यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, मी देखील शेतकरी कुटूंबातील आहे. त्यामुळे तांगडे यांच्या घरी आल्यासारखे वाटत नसून स्वतःच्याच घरी आल्याची भावना आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून, या परिस्थितीत समाजातील प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला असून, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांत ही रक्कम जमा झाली आहे. तसेच दुष्काळ जाहीर केल्यानंतर बारा कलमी सवलतींची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नुकसान भरपाईसह पीक कर्जाचे पुनर्गठन, सक्तीच्या वसुलीला स्थगिती, शैक्षणिक शुल्कात सवलत आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा उपाययोजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.500अंबादास तांगडे यांच्याकडे केवळ एक एकर शेती असून, पत्नी मंदाबाई, दोन मुली, एक मुलगा आणि आई अशा कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवर अवलंबून आहे. कुटूंबाची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर शिंदे यांनी तांगडे यांच्या मुलीशी संवाद साधला. तिला भविष्यात पोलीस अधिकारी व्हायचे असल्याचे समजल्यानंतर तिच्या शिक्षणापासून विवाहापर्यंतची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले.500याशिवाय दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटूंबांतील मुलींचे विवाह ठरले आहेत, अशा कुटूंबांची माहिती संकलित करून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर केला. शेतकरी कुटूंबांना आधार देण्यासाठी महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन, विद्यार्थिनींना सायकली आणि गरजू कुटूंबांना दिवाळीचा शिधा देण्याचे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी पावसाळ्यापर्यंत दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, चारा आणि अन्नधान्य उपलब्ध राहावे, यासाठी शासन नियोजन करीत आहे. केंद्र सरकारही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी हा शासनाच्या तिजोरीवरील पहिला हक्कदार असून, त्याला मदत करताना सरकार कोणतीही कमतरता ठेवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी धीर सोडू नये आणि कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.500भाऊबीजेनिमित्त मंदाबाई तांगडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे औक्षण केले. त्यानंतर शिंदे यांनी तांगडे कुटूंबातील सर्व सदस्यांना कपडे भेट दिले. यावेळी मंदाबाई यांनी त्यांना दहा किलो ज्वारी आणि दहा किलो बाजरी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. शासनाचे प्रमुख पदावरील व्यक्ती आपल्या घरी येऊन सुख-दुःखाची विचारपूस करतात, ही समाधानाची बाब असल्याची भावना अंबादास तांगडे यांनी व्यक्त केली.500यानंतर मौजपुरी गावातील महादेव मंदिर परिसरात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी, शेतमजूर आणि महिलांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत दिवाळीचा फराळ व शिधा देऊन महिलांचा सन्मान केला. या वेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उढाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button