दुष्काळग्रस्तांच्या दिवाळीत शिवसेनेचा मदतीचा हात! बार्शी तालुक्यातील अनेक गावांत दिवाळी शिध्याचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी, शेतमजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने बार्शी तालुक्यात दिवाळी शिधा वाटप अभियान राबविण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून उपलब्ध झालेल्या दिवाळी शिध्याचे तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरजू कुटुंबांना वाटप करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याच्या खासदार ज्योती वाघमारे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ठोंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. बार्शी तालुक्यातील लक्षाची वाडी, नागोबाची वाडी, गाताची वाडी, गाडेगाव, बार्शी शहर, सुखदेव नगर, खांडवी, देवगाव, धामणगाव, तडवळे, ईरले, तुळशीदासनगर, उपळाई ठोंगे, तळेगाव, निंबळक, हाळदुगे, बावी, चिखर्डे, सावरगाव, मालेगाव, उपळे, आंबेगाव आणि दहितणे आदी गावांमध्ये शिध्याचे वाटप करण्यात आले.
नागोबाची वाडी येथे बार्शीचे मंडळ अधिकारी कोरके साहेब आणि माजी तलाठी व स्वातंत्र्यसैनिक सुनील चंदनशिव यांच्या शुभहस्ते दिवाळी शिधा वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नाना पाटील, अविनाश शिंदे, शीतल मांजरे, मेहेंदी लांडगे, दत्ता देवकर, प्रहार संघटना तथा शिवसेनेच्या नेत्या संजीवनी बारंगुळे, निलेश पायगन, प्रमोद घोडके, मच्छिंद्र करडे, पांडुरंग बारंगुळे, पंकज भोसले यांच्यासह शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
या अभियानाचे नियोजन जिल्हाप्रमुख ठोंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पांडुरंग पाटील, संजीवनी बारंगुळे, अविनाश शिंदे आणि शीतल मांजरे यांनी केले. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून पाठविण्यात आलेली मदत अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या दिवाळीत आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा शिवसेनेचा हा उपक्रम ठरला.




