दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते नटराज नाट्य कला मंडळ, तिरंगा सर्कल येथे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्रीमती पवार यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.500याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, नगराध्यक्ष सचिन सातव, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, पवार कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.500कार्यक्रमानंतर श्रीमती पवार यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र दालनाचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनी या दालनाला भेट देऊन छायाचित्रांची पाहणी केली. पोलीस बँड पथकाच्यावतीने पुतळ्यास मानवदंना देण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिवादनाप्रित्यर्थ सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आली. तसेच निलिमा नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गीत वदंना सादर केली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या