कोल्हापूरमहाराष्ट्र

अनाथ चिमुकलीला मिळाले हक्काचे कुटुंब

B1न्यूज मराठी नेटवर्क500

कोल्हापूर, दि. ११ : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली, २०२२ अंतर्गत जिल्ह्यातील पहिला दत्तक विधान आदेश यशस्वीरीत्या पारित करण्यात आला. या निर्णयामुळे एका अनाथ चिमुकलीला प्रेमळ, सुरक्षित आणि हक्काचे कुटुंब लाभले असून दत्तक पालकांचे अनेक वर्षांचे पालकत्वाचे स्वप्नही साकार झाले आहे.

दत्तक प्रक्रिया ही कायदेशीर तरतुदी, बालकाच्या सर्वोत्तम हिताचा विचार आणि सर्व आवश्यक पडताळण्या पूर्ण करून पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली. 500

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधित आदेश पारित करून या संवेदनशील प्रक्रियेला अंतिम मान्यता दिली. या प्रक्रियेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, संबंधित दत्तक संस्था तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून दत्तक प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

प्रत्येक बालकाला प्रेम, सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. दत्तक व्यवस्थेमुळे निराधार बालकांना कुटुंबाचा आधार मिळण्याबरोबरच समाजात संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी दिली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button