अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांनीमिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करणे ही योजना सुरु केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचतगटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर या कार्यालयाकडे दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कल्याण श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने याची खरेदीचे कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किंमतीच्या 10टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रू. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय देय राहील.ज्या लाभार्थ्यांनी पॉवर टिलर व मिनी ट्रॅक्टर या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा पुन्हा लाभ दिला जाणार नाही. स्वयंसहाय्यता बचत गटांना योजनेचा लाभ दिल्यानंतर सदरची वस्तू गहाण किंवा विकता येणार नाही.स्वयंसहाय्यता बचत गटांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे व सदर खाते आधार कार्डशी संलग्न असावे. स्वयंसहाय्यता बचत गटांचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटांतील सर्व सदस्यांचे रेशनकार्ड, आधारकार्ड, ग्रामसेवक सरपंच व तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र असावे.प्राप्त उध्दिष्टानुसार व उपलब्ध तरतुदी पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांचे विहित नमुन्यातील अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. परिपूर्ण प्रस्ताव विहीत मुदतीत सादर करावा. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही,असे आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त कल्याण श्रीमती सोनवणे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या