अमरावतीक्रीडा विषयकमहाराष्ट्र

अमरावतीच्या कुमकुम मोहोडचा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णवेध; मिक्स्ड टीम प्रकारात भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

अमरावती : तुर्की येथील अंतालिया येथे ९ ते १४ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-३’ (धनुर्विद्या विश्वचषक) स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. अमरावतीच्या खेलो इंडिया केंद्राची प्रशिक्षणार्थी कुमकुम मोहोड हिने भारतीय संघातील धीरज बोम्मादेवरा राय याच्यासह मिक्स्ड टीम (मिश्र संघ) प्रकारात अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ५-१ अशा सेट फरकाने पराभव करून भारताला हे ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे.5000

अमरावती येथील खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात मागील आठ वर्षांपासून राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करणाऱ्या कुमकुमच्या या सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय यशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव वाढला आहे. तसेच यापूर्वीही चीन येथे झालेल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-२ स्पर्धेत तिने भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुमकुमच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.5000उपसंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर आणि अध्यक्ष अॅड. श्री. प्रशांत देशपांडे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. कुमकुमची सध्याची प्रगती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्य पाहता ती आगामी स्पर्धांमध्येही भारताला आणखी पदके मिळवून देईल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक प्रफुल डांगे यांनी व्यक्त केला असून कुमकुम आता जुलै २०२६ मध्ये स्पेन येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड कप स्टेज-४’ आणि जपान येथे होणाऱ्या ‘२० व्या आशियाई क्रीडा’ स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button