अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त रातंजन येथे १०१ जणांचे रक्तदान

श्री अशोक नागटिळक महाराज यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजित केले होते या रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या हस्ते रेबिन कापून शिबिराचे उद्घाटन केले. विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी समाधान बनसोडे मालेगांव सरपंच, ज्योती शहाजी जाधव हत्तीजचे सरपंच, सतीश वाघमारे माजी नगरसेवक, रवी राठोड सरपंच तांडा, रमाकांत जाधव पोलीस पाटील, संस्थेचे सचिव बापू नागटिळक, उर्मिला काकी देशमुख, पोपट जाधव , महादेव काटकर, विजय पवार , निकील काटकर , सिद्राम नागरगोजे, डॉ. धीरज बनसोडे, सागर पारडे, बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून श्री अशोक नागटिळक महाराज यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो. या रक्तदान शिबिरामध्ये 101 लोकांनी रक्तदान केले. रक्तदान करून रक्तदात्यांनी शिबिरास चांगला प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष गौतम नागटिळक , महामानव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी , बापू नागटिळक , विष्णू शिंदे , निलेश गिराम , ओंकार कांबळे, सुरज रसाळ, गौतम वाघमारे, अरविंद आतकरे, किरण खुरंगळे , गणेश लंगोटे , रणजित जाधव, श्रीराज हजारे, समाधान डवरी,स्वप्निल भालशंकर रितेश नागरगोजे, सनी काळे , बाळू क्षीरसागर , बाळू नागटिळक , ज्ञानेश्वर चव्हाण तसेच संस्थेचे पदाधिकारी , अशोक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
भगवंत ब्लड बँकेचे अभय जगदाळे , अनिरुद्ध देशमाने ,राधिका बेले, राधिका ढोंगे , प्राजक्ता नलवडे , रोहिणी शिंदे यांनी यशस्वी रक्त संकलन केले. सूत्रसंचालन भैरवनाथ चौधरी तर प्रस्तावना आभार प्रदर्शन गौतम नागटिळक यांनी केले.