बार्शीमहाराष्ट्र

टाळ-मृदुंगाच्या गजरात बार्शीत श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. १९ : टाळ-मृदुंगाच्या गजरात, “विठू माऊली”च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वारदवाडी फाटा, शेंद्री येथे उत्साहात आगमन झाले. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच पालखीचे भाविकांनी आणि प्रशासनाच्या वतीने जल्लोषात स्वागत केले.

बार्शी तालुका व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांनी श्री संत मुक्ताई पालखीचे विधिवत स्वागत केले. श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर असा पायी प्रवास करणाऱ्या या पालखी सोहळ्याने धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पाच जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणारा हा पालखी सोहळा वारकरी संप्रदायातील श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो.500सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच शेंद्री ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. टाळ, मृदुंग, फुगड्या, अभंग आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने परिसर भक्तिमय झाला होता.

यावेळी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, “आज श्री संत मुक्ताई पालखीचे बार्शीत आगमन होणे ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची बाब आहे. सोलापूर जिल्ह्याच्या वतीने या पवित्र पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याचा मान मला लाभला. सपत्नीक श्री संत मुक्ताईंचे मनोभावे दर्शन घेतले. श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर असा पाच जिल्ह्यांचा प्रवास करणारी ही दिंडी श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा संदेश देणारी आहे. सोलापूर प्रशासन आणि शेंद्री ग्रामस्थांनी केलेल्या भक्तिमय स्वागतामुळे वारकरी बांधवांना मोठा आधार मिळाला आहे. सर्व वारकरी बंधू-भगिनींना सुखरूप, आनंददायी आणि मंगलमय वारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”500यावेळी संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्रजी हरणे, जि.प. अध्यक्ष दीपक वैद्य यांचे वडील अरुण वैद्य, नगराध्यक्षा सौ. तेजस्विनीताई कथले, सभापती सौ. मीनाक्षीताई रोंगे, सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, वारकरी बंधू-भगिनी आणि शेंद्री परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button