शेतीच्या वादात खून केल्याप्रकरणी आरोपीला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : माढा तालुक्यातील मौजे फूटजवळगाव येथील शेतकरी चंद्रकांत हांडे हे दिनांक 5-10-2019 रोजी सकाळी 10-45 वा. सुमारास ज्वारी पेरण्यास शेत नीट करण्यासाठी गेले असता, बायडाबाई कोळेकर ही शेतात येणाऱ्या ट्रॅक्टरवर दगड मारून शिवीगाळ करू लागली व ते तिथेच उभा असलेला हनुमंत दगडू कोळेकर हा चंद्रकांत हांडे यांना जमीन कशी वहीवाटतो ते पाहतो असे म्हणून शिवीगाळ करू लागला तेव्हा तिथेच उभे असणारे हनुमंत कोळेकर यांचे नातेवाईक दत्तात्रय कृष्णा हांडे, अजिनाथ ज्ञानदेव हांडे व हरिदास जनार्दन हांडे यांनी त्याला आज सोडू नको काही घडल्यास आम्ही पाहतो असे म्हणून प्रोत्साहन दिल्याने हनुमंत कोळेकर याने हातातील कुऱ्हाडीने चंद्रकांत हांडे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात घाव घातला, त्यातच ते गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, मयताचा मुलगा सूर्यकांत चंद्रकांत हांडे यांनी वरील आरोपी 1) हनुमंत दगडू कोळेकर, 2) बायडाबाई हनुमंत कोळेकर, 3) दत्तात्रय कृष्णा हांडे, 4) अजिनाथ ज्ञानदेव हांडे व 5) हरिदास जनार्दन हांडे यांचे विरुद्ध टेंभूर्णी पोलीस ठाणेस गु.र.नं 457/2019 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास Dysp श्री विशाल हिरे यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी 14 साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष, डॉ. इनामदार यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार Dysp श्री विशाल हिरे यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम यांनी मा न्यायालयासमोर मांडले.

सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता मा.जिल्हा न्यायाधीश एल.एस चव्हाण साहेब यांनी आरोपी हनुमंत दगडू कोळेकर रा. फूटजवळगाव ता माढा यास भादविक 302 अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व 10,000/- रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. उर्वरित आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सरकार पक्षा तर्फे श्रीमती राजश्री कदम यांनी काम पाहीले. सदर केसमध्ये अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व दिपक पाटील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी काम पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या