विधानसभा मतदार संघासाठी 19 उमेदवारांचे 25 नामनिर्देशन अर्ज दाखल , आजपर्यंत 391 उमेदवारांना 904 नामनिर्देशन अर्जाचे वितरण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

जालना : दि.25 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आजरोजी 19 उमेदवारांनी 25 नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयान दिली आहे.

आज शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर, 2024 रोजी 99-परतूर विधानसभा मतदारसंघासाठी सुरेशकुमार कन्हैलाल जेथलिया (अपक्ष), निळकंठ बाबासाहेब वायाळ (अपक्ष), रामप्रसाद किसानराव थोरात (वंचित बहूजन आघाडी), श्रीराम बन्सीलाल जाधव (जय सेवालाल बहूजन विकास पार्टी) प्रत्येकी एक नामनिर्देशन अर्ज दाखल तर कृष्णा त्रिंबकराव पवार (ऑल इंडिया हिन्दुस्थान पार्टी आणि अपक्ष) यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. तर 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी निसार सुभानखा पठाण (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन आणि अपक्ष), गजानन रामनाथ उगले (अपक्ष) यांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशन अर्ज 101-जालना विधानसभा मतदारसंघासाठी रंजीत काशिनाथ निकाळजे (अपक्ष) आनंदा लिंबाजी ठोंबरे (अपक्ष), अतुल नारायणराव इंगळे (अपक्ष) संगिता कैलास गोरंट्याल (अपक्ष) प्रत्येकी एक नामनिर्देशन अर्ज 102- बदनापूर(अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी काकासाहेब बाबूराव भालेराव (अपक्ष), दिपक लक्ष्मण डोंगरे (अपक्ष), चौधरी रुपकुमार नेहरुलाल (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) सुश्मिता निवृत्ती चव्हाण (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन अर्ज तर 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी रवि विजयकुमार हिवाळे (अपक्ष), कडूबा म्हातारबा इंगळे (अपक्ष), सर्जेराव हरिबा लोखंडे (अपक्ष) प्रत्येकी एक नामनिर्देशन तर चंद्रकांत पुंडलीकराव दानवे (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी चार अर्ज नामनिर्देशन दाखल केले आहे. याप्रमाणे आज एकुण 19 उमेदवारांनी 25 नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.

आजपर्यंत एकूण 391 इच्छुक उमेदवारांना 904 नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. उमेदवारांना मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर, 2024 रोजीपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 यावेळेत आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. तसेच बुधवार, दि. 30 ऑक्टोबर, 2024 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 4 नोव्हेंबर, 2024 रोजीपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार असून, शनिवार दि. 23 नोव्हेंबर, 2024 रोजी जाहिर केला जाणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या