बार्शीमहाराष्ट्रवनविभाग

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली सुटका

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील नरहरी लक्ष्मण राऊत यांच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडलेला दिसला त्यानंतर त्यांनी शफिक आतार यांच्या मदतीने कोल्हा बाहेर काढण्यास प्रयत्न केले परंतू त्यांना यश आले नाही त्यानंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वनविभागाच्या टिम तात्काळ घटना स्थळी दाखल झाले त्यांच्या दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले त्यांनंतर त्यांनी जवळच्या शेतात कोल्हा सोडून दिला रात्रीच्या अंधारात विहिरीचा अंदाज न आल्यानेच कोल्हा विहिरीत पडला असल्याचे वैराग वनरक्षक अधिकारी सचिन पुरी यांनी सांगितले त्यांच्या बरोबर कालीचरण वस्ताद , विशाल गाडे , लक्ष्मण शिंदे , संदिप निचळ आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button