बार्शीमहाराष्ट्र

बार्शी येथे महिलांवरील अत्याचाराविरोधात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : युवासेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना युवासेना सचिव वरुणजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, जिल्हा प्रमुख सीमा ताई पाटील तसेच युवासेना सहसचिव आणि सिनेट सदस्य ॲड. उषा नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांवरील आणि युवतींवरील अत्याचारांचा निषेध करण्यासाठी बार्शी येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

ही मोहीम विशेषत: महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेल्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राबवण्यात आली. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी घट होईल आणि गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

युवासेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, माजी नगर अध्यक्ष कृष्णराज बारबोले, युवती सेना तालुकाप्रमुख रजनी पाटील, पांडुरंग घोलप, दीपक तिवाडी, विशाल वाणी, अजिंक्य बारुंगुळे, बाळराजे पिंगळे, शुभम पवार, नवनाथ चोबे, बाळासाहेब मुडे, भीमराव गंधुरे, राहुल बुरसे यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. या मोहिमेद्वारे महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून, बार्शी तालुक्यात या मोहिमेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button