रस्त्यावर फेकलेल्या विषारी बाटलीने घेतला चिमुकलीचा जिव , बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील घटना, महिना भर मृत्यूशी दिली अपयशी झुंज

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : गावातील रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी फेकुन दिलेली विषारी औषधाची बाटली लहान चिमुकलीने खेळण्यासाठी घेतली नंतर तिने खेळत खेळत त्या बाटलीतील विषारी औषध प्राशन केले त्यामुळे मुंगशी येथील दुर्वा विनोद क्षीरसागर वय 3 वर्षे या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाला लहान चिमुकलीच्या गेली महिनाभर सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर शेवटची ठरली ही घटना बार्शी तालुक्यातील मुंगशी ( वा ) येथे घडली आहे तिने औषध प्राशन केल्याची घटना तिचे सोबत असणारे चिमुकले संवगडी यांच्यामुळे उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ उलटीचा त्रास सुरू झाल्याने तिच्यावर वैराग येथे खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून तिला बार्शी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले परंतू तिचे शरीर साथ देत नसल्याने तिला सोलापूर येथे हलवण्यात आले परंतू तिच्या संपूर्ण शरिरात विष भिणल्याने प्रकृती चिंताजनक झाली होती त्यानंतर काल तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनं मात्र मुंगशी गावात हळहळ व्यक्त होत आहे अशा घटना समाजात घडत असताना पालकांनी देखील आपल्या लहान मुलांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे तसेच विषारी औषधे वापरणाऱ्या व्यक्तींनी देखील ते औषध वापरल्यानंतर बाटली किंवा पॅकेटची काळजीपुर्वक विल्हेवाट लावली पाहिजे तरच अशा दुर्घटना टळतील.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या