युवा प्रतिष्ठान च्या दहीहंडी चा मानकरी यश चंदनशिवे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शिवछत्रपती क्रीडा व सांसकृतिक मंडळ संचलित युवा प्रतिष्ठानच्या मानाची दहीहंडी फोडण्याचा मानकरी यश चंदनशिवे ठरला आहे. बार्शी शहरातील कसबा पेठ मधील हांडे गल्लीत परंपरे नुसार दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून मागील १२ वर्षा पासून दहीहंडी उत्सवास मोठे स्वरूप देण्यात आले आहे.

बार्शी येथील युवा प्रतिष्ठानची ओळख प्रत्येकवर्षी आगळे वेगळे देखावे, सामाजिक उपक्रम या साठी आहे. एका बाजूला उत्सवाच्या निमित्ताने धांगडधिंगा व सेलेब्रिटी महिलांचा डान्स असेल प्रकार वाढत असताना कायम वेगळेपण जपणाऱ्या युवा प्रतिष्ठानने या वर्षी दहीहंडी उत्सवातून आजच्या युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

दहीहंडी उत्सवासाठी केवळ युवकांचा जल्लोष व धिंगाणा असे समीकरण न ठेवता शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन केले होते. या मध्ये तलवारबाजी, काठी, लाठी याची प्रात्यक्षिके बार्शी येथील माधवराव देशमुख व त्यांच्या टीम ने सादर केली. तसेच डॉल्बी वर केवळ धांगडधिगा न करता देशभक्ती ची गाणी लावत उपस्थित सर्वच नागरिकांच्या अंगात उत्साह संचारला होता.

दहीहंडीसाठी खास रेनडान्स ची सोय करण्यात आली होती. तर उत्सव ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची डिजीटल व स्क्रिन सर्वांना आकर्षित करत होते. त्याच बरोबर मोठ्या स्क्रिन वर युवा प्रतिष्ठान ने केलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती देणारी चित्रफीत ही लावण्यात आली होती. नेहमी प्रशासनाला सहकार्य करणारी भूमिका बजावत या बार्शी ही पोलीस प्रशासनाने दिलेल्या वेळेच्या आर्धा तास दहीहंडी उत्सव पूर्ण करण्यात आला.

युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गायकवाड, अक्षय चव्हाण, बिट्टू बारंगुळे, दयानंद धुमाळ, अण्णा साळुंखे, दिपक नवले, मनू चव्हाण, केतन वायचळ, ओंकार वायचळ,सोहम वायकुळे, नागेश सुरवशे,प्रथमेश पाटील, प्रशांत घोडके , अभिषेक गवळी, वैभव गरड,आकाश चव्हाण, दिपक भुजबळ, आकाश गाडे सोनू नवले, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम आयोजनासाठी तारा इलेक्ट्रॉनिक बार्शी यांचे विशेष सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या