आंदोलनमहाराष्ट्रमुंबई

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ज्वारी व आंबा पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना कळविण्यात आनंद होतो की, महाराष्ट्रात राज्यात विमा योजना अंतर्गत २०२३/२४ मध्ये राज्यातील रब्बी हंगामातील ज्वारी व आंबा पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 असा होता.

मात्र पिक विमा पोर्टल मध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले. सदर शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टिकोनातून राज्यातील रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी व आंबा पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक 2 / 12 / 23 अन्वये दिनांक 4 व 5 डिसेंबर 2023 अशी दोन दिवसाची अतिरिक्त (वाढीव) मुदतवाढ मंजूर केली आहे.

यामुळे आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी वरील पिकांसाठी दिनांक 4 व 5 डिसेंबर 2023 रोजी विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. तसेच रब्बी हंगामातील पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी गहू, हरभरा, कांदा या पिकासाठी दिनांक 15 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत आहे. तरी महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांनी पिक विमा योजनेत सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button