नवी दिल्लीमहाराष्ट्र

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान करणार अनावरण , नौदल दिन 2023 कार्यक्रमाला राहणार उपस्थित

पंतप्रधान चार डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. संध्याकाळी 4.15 वाजता महाराष्ट्रातील सिंधुदूर्गला पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या,विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.

दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदूर्ग येथील ‘नौदल दिन 2023’ सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करत आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे पंतप्रधानांनी जलावतरण केले तेव्हा शिवरायांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत साकारण्यात आलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला आहे.

दरवर्षी, नौदल दिनानिमित्त,भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात. हे राष्ट्रीय सुरक्षेप्रती नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते, तसेच नागरिकांमध्ये सागरी जनजागृतीचा प्रसारही करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button