बार्शीमहाराष्ट्र

ॲड दिलीपराव सोपल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : दिलीपराव सोपल विद्यालय व महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.२००१ एस एस सी च्या वर्गमित्रांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विनायक डोईफोडे हे होते प्रमुख पाहुणे पांडुरंग शिंदे उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य अशोक झालटे उपस्थित होते तसेच सुधीर गायकवाड, मधुकर सूर्यवंशी, श्रीहरी कापसे, सुधाकर जाधव, नवनाथ जाधव, महादेव मुळे, विजयकुमार शिंदे, सुमित कानगुडे, धनाजी लोंढे, इत्यादी शिक्षक गण उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदरणीय कोरके बप्पा व तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विनायक डोईफोडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय मनाशी बाळगले पाहिजे. आपण समाजाचे काही देणे आहोत म्हणून समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. अशी तळमळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी गतिशील राहावे मोठी स्वप्ने पहावी तरच जीवनात गतिशीलता कायम राहते असे ते बोलत होते. प्राचार्य झालटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे शिक्षक सुधीर गायकवाड आपल्या खास शैलीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी संस्थेसाठी काहीतरी केले पाहिजे. आपण विद्यालयाचे काहीतरी देणे लागतो. ही भावना मनाशी जोपासली पाहिजे असे ते मेळाव्यात बोलत होते. मधुकर सूर्यवंशी, श्रीहरी कापसे, महादेव मुळे, नवनाथ जाधव, पांडुरंग शिंदे या सर्व आदरणीय शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये रामा पवार, महादेव डोईफोडे, राकेश विश्वरूपे, वर्षाराणी शेळके, मेघा पाटील, या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मेघा पाटील, वर्षाराणी शेळके, पुनम कुंभार, स्मिता शेळके, लक्ष्मी थडके, अश्विनी बरबडे, सारिका बारवकर, सारिका मोहिते, भाग्यश्री भाले, रामा पवार’ महादेव डोईफोडे, राकेश विश्वरूपे, रमेश तूप समुद्रे, सचिन शेळके, दत्तात्रय भाले, बालाजी शेळके, भैरवनाथ लोहार, परमेश्वर माळी संतोष तूप समुद्रे, दत्तात्रय चिकणे, दीपक बरबडे, मेजर डोईफोडे, अमोल सोनार, अंकुश माळी, प्रदीप शिंदे, अशोक वायकर, बाळू तूपसमुद्रे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन रामा पवार यांनी केले. तर आभार महादेव डोईफोडे यांनी मानले हा मेळावा यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले त्यामुळे हा सोहळा अतिशय अविस्मरणीय असा सोळा संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button