पालघर जिल्ह्यात योगमय वातावरणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून योग दिन साजरा
पालघर : 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी योगशिक्षकांसह 3 हजार 376 शालेय विद्यार्थ्यांच्या बरोबरीने पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला सकाळपासूनच मैदान योगमय झाले होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघरच्या वतीने योग दिनाच्या निमित्ताने शासकीय कार्यक्रमाचे आयोजन पालघर येथील आर्यन हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर पालघरचे तहसीलदार श्री.शेंडगे शिक्षणाधिकारी संगीता भागवत तालुका शिक्षणाधिकारी निमिष मोहिते जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने, प्रकाश वाघ आणि पतंजली परिवार पालघरच्या वतीने अखंडिता बाजपेयी, गजानन किणी, काळुराम चौधरी व त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सफाळे येथील विदीश राऊत यांने रीदमिक योगासनाची प्रात्यक्षिके दाखवली विदिश राऊत हा योगामध्ये राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक वाढवत आहे. 2020 साली योगा फेडरेशनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांने सुवर्णपदक पटकावले होते. विदिश हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके पटकावत आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते विदीश राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शारीरिक व मानसिक आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी सर्वांनी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. नियमित योगा केल्यास ताण-तणावापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस शरीरात ऊर्जा मिळते आणि तुमचा उत्साह कायम राहतो असे अनेक फायदे योगामुळे होतात त्यासाठी सर्वांनी नियमित दररोज योगा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गास केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने संपूर्ण पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये कनिष्ठ महाविद्यालय कंपन्याच्या कार्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये योग दिन योगमय वातावरणात साजरा करण्यात आला.