महाराष्ट्रसोलापूर

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन उळे येथे प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : गण गण गणात बोते, गजानन माऊली आणि विठू नामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. उळे (ता. दक्षिण सोलापूर ) येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दर्शन घेऊन पालखीचे व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत केले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सहकुटुंब दर्शन घेऊन पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत केले. तसेच माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार राजशेखर लिंबारे, तहसीलदार उत्तर सैपन नदाफ, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनीही पालखीचे दर्शन घेतले.


पालखीच्या स्वागतासाठी नायब तहसीलदार शुभांगी जाधव, दत्तात्रय गायकवाड, आप्पा धनके, सुरेश हसापुरे, धनेश अचलारे, सरपंच डांगे, मंडल अधिकारी जगदेवप्पा धनुरे, तलाठी समाधान काळे, ग्रामसेवक पठाण, विस्तार अधिकारी कमळे, मुख्याध्यापक लिंबराज जाधव, सोनाली इंजेवाड, मनोज गुंड, दत्ता खंडागळे, सचिन शिंदे, पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी परिश्रम घेतले.
पालखीचा मुक्काम आज उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे असून पालखी सोहळा गुरुवार दिनांक 22 जून रोजी सकाळी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button