महाराष्ट्रमुंबई

पुण्यात एस टी आगारात महिलेवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली असता एका व्यक्तीने तिला फसवून बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे.

एस टी बस आगारमध्ये रात्री अपरात्री पहाटे प्रवासी थांबत असतात.त्यात महिला प्रवासी ही असतात. त्यामुळे एस टी बस आगारात पोलिस गस्त आणि रात्री पोलिस सुरक्षा आवश्यक आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि पुन्हा असे प्रकार होऊ नये यासाठी राज्य सरकार ; सुरक्षा यंत्रणा आणि एसटी प्रशासनाने ही दक्षता घेऊन उपाययोजना करायला हवी असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button