ग्रामपंचायतबार्शी

बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विविध विकास कामांसाठी १ कोटी ५२ लाख मंजूर : आमदार राजाभाऊ राऊत

बार्शी : तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नामुळे जनसुविधा विशेष निधी अंतर्गत बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विविध विकास कामांसाठी १ कोटी ५२ लाख मंजुरी

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२२-२३ जनसुविधा विशेष अनुदान योजने अंतर्गत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नामुळे बार्शी तालुक्यातील पुढील गावांना गाव अंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झाला आहे:-रूई (७ लाख), घाणेगाव(७ लाख),यावली(७ लाख), मानेगाव (७ लाख),सासुरे(७ लाख), मळेगाव( ७ लाख),श्रीपत पिंपरी ( ७ लाख),आगळगाव(७ लाख),मालेगाव(७ लाख),सुर्डी(७ लाख),हत्तीज(७ लाख), बेलगाव(१० लाख),धामणगाव(५ लाख),तावरवाडी(५ लाख),वांगरवाडी(५ लाख),रस्तापूर(५ लाख),उंबर्गे (५ लाख), हळदुगे(५ लाख),भानसळे(५ लाख),कापसी(५ लाख), सावरगाव(५ लाख),तांदुळवाडी(५ लाख),आंबेगाव (५ लाख), गुळपोळी (५ लाख),खडकोणी (५ लाख).

बार्शी तालुक्यातील गाव अंतर्गत रस्ते कामासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नाने विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून त्या माध्यमातून शहर व तालुक्यातील विकास कामांना गती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावात शासनाच्या विविध योजना राबविण्याचे माझे ध्येय आहे असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधा योजने अंतर्गत निधी मंजूर केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button