तीर्थक्षेत्र पर्यटन विकासासाठी ४ कोटी ८१ लाख ४२ हजार रुपये मंजूर : आमदार राजाभाऊ राऊत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील तिर्थक्षेत्राचा पर्यटन विकास करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत काळेगाव, लाडोळे, जामगाव (पा), सासुरे, खडकलगाव, भातंबरे, घारी, दडशिंगे, कोरेगाव, पानगाव,हळदुगे, साकत, कोरफळे, मळेगाव,उपळे दुमाला, पिंपळगाव ढाळे, धानोरे, झरेगाव, चिंचोली, शेळगाव आर, रातरंजन, काटेगाव, गोरमाळे येथील तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास करण्यासाठी ४ कोटी ८१ लाख ४२ हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये श्री क्षेत्र नरसिंह मंदिर काळेगाव येथील मंदिर परिसर सुधारणा करणे यासाठी ४९ लाख, श्री क्षेत्र सदानंद महाराज मंदिर,लाडोळे येथे रस्ता, वाहनतळ करणे यासाठी १० लाख,श्री क्षेत्र महाकालेश्वर मंदिर सासुरे येथे सभा मंडप बांधणे यासाठी २१ लाख, श्री क्षेत्र खंडोबा मंदिर खडकलगाव येथे रस्ता व पेव्हिंग ब्लॉक बसवणे यासाठी १९ लाख,श्री क्षेत्र जगदंबा मंदिर भातंबरे येथे रस्ता व पेव्हींग ब्लॉक बसविणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र नागनाथ मंदिर घारी येथे मंदिर परिसर सुधारणा करणे यासाठी २९ लाख,श्री क्षेत्र बाळपीर देवस्थान,दडशिंगे येथे रस्ता व पेव्हिंग ब्लॉक बसविणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र श्यामनाथ मंदिर कोरेगाव येथे यात्री निवास बांधणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र कालभैरवनाथ मंदिर पानगाव येथे सभामंडप,किचन शेड, शौचालय बांधणे यासाठी २० लाख, श्री क्षेत्र बाळराजे देवस्थान हळदुगे येथे रस्ता व वाहनतळ करणे यासाठी २० लाख, श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिर साकत येथे रस्ता व वाहनतळ व संरक्षण भिंत बांधणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र यमाई मंदिर कोरफळे येथे रस्ता व वाहनतळ करणे, संरक्षण भिंत बांधणे यासाठी २० लाख, श्री क्षेत्र नर्मदेश्वर मळेगाव येथे सभामंडप रस्ता व पेव्हिंग ब्लॉक बसवणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर उपळे दुमाला येथे यात्री निवास,रस्ता व वाहनतळ करणे संरक्षण भिंत बांधणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र सिद्धनाथ मंदिर उपळे दुमाला येथे यात्रे निवास रस्ता वाहनतळ करणे संरक्षण भिंत बांधणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र दत्त मंदिर पिंपळगाव ढाळे येथे रस्ता व वाहनतळ करणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र येमाई मंदिर धानोरे येथे यात्री निवास बांधणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र रूपादेवी मंदिर झरेगाव येथे सभामंडप रस्ता संरक्षण भिंत बांधणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र नीलकंठेश्वर मंदिर चिंचोली येथे शेड बांधणे व दुरुस्ती करणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र महादेव मंदिर शेळगाव आर येथे रस्ता,वाहनतळ करणे यासाठी १० लाख,श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर रात रंजन येथे शौचालय बांधणे व वाहनतळ करणे यासाठी १० लाख,श्री क्षेत्र हजरत दर्गा सय्यद अल्लादिन दर्गा काटेगाव येथे संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे यासाठी २० लाख,श्री क्षेत्र सिद्धनाथ देवस्थान गोरमाळे येथे रस्ता करणे १० लाख इत्यादी कामे करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारच्या विकासाच्या धोरणामुळे तीर्थक्षेत्रासाठी निधी वितरित केला आहे.आमदार राजाभाऊ राऊत यांनी सर्वांचे आभार मानले. बार्शी तालुक्याचा अध्यात्मिक तालुका म्हणून नावलौकिक आहे.या निधीमुळे तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासाला गती मिळेल असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या