क्राईमबार्शी

बलात्काराची फिर्याद का दिली म्हणून अल्पवयीन मुलीवर कोयता व सत्तुरने वार

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : आरोपींनी पिडीतास तु पोलीसांत आमच्या विरुध्द बलात्काराची तक्रार का दिलीस, तुला आत्ता जिवंत ठेवत नाही असे म्हणून सत्तुर व कोयत्याने वार करून गंभीर जखमी करत जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बार्शी तालुक्यात घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
अक्षय विनायक माने , नामदेव सिध्देश्वर दळवी दोघे (ता. बार्शी) असे आरोपीचे नावे आहे. दोन्ही आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहीती की पिडीता ही अल्पवयीन असुन दि ५ मार्च रोजी रात्री ९.३० वाजण्याचा सुमारास आरोपी अक्षय माने व नामदेव दळवी या दोघांनी पिडीता अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शारीरिक संबंध केला. त्याबाबत रात्री शहर पोलीस ठाणे येथे येवुन मुलगी निर्भया हिने तक्रार दिली सदर आरोपी विरुद्ध भादवि कलम 376, 354, 341, 323, 504, 506, 34 व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर दि ६ मार्च रोजी सायंकाळी पोलीसांनी पिडीतास मेडीकल तपासणीसाठी बोलवले होते. पिडीतास व पाहुण्याचे दोन मुली घरी ठेवुन पिडीताचे आई वडील दोघे बार्शी पोलीस ठाण्यात आले होते . दरम्यान पोलीस ठाण्यात असताना सांय ८ वा. चे सुमारास पिडीताच्या वडीलास आमचे शेजारी राहणाऱ्या एका मुलीने फोन करून सांगितले पिडीतास दोन मुलांनी सत्तुर व कोयत्याने मारले असल्याचे सांगितले त्यावेळी गावी जावून पाहिले असता एका घरात पिडीता ही जखमी अवस्थेत पडली होती तिच्या डोक्यात, कपाळावर, कोपराजवळ व हाताच्या बोटावर कापीव जखमा होऊन रक्त येत होते. हाताचे दोन बोटे तुटलेले दिसले व पिडीता बेशुद्ध होती. दरम्यान तिला बार्शी येथे खाजगी हॉस्पीटल मध्ये दाखल केले ती शुद्धीवर आल्या नंतर यातील आरोपी अक्षय व नामदेव दोघांनी बलात्काराची फिर्याद का दिली म्हणुन सत्तुर व कोयत्याने सपासप वार केल्याचे सांगितले. याबाबत भादवि 307,326,324.506.34 प्रमणे गुन्हा दाखल झाला असुन तपास सपोनि परजणे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button