बार्शी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील ३ कोटी ५४ लाख ५१ हजार रूपये मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन…

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते प्रभाग क्रमांक ४ मधील लक्ष्मीनगर ते जावळी प्लॉटला जोडणारा रस्ता डांबरीकरण करणे यासाठी ४३ लाख ७९ हजार,बार्शी शहर येथील शाळा नंबर १७ येथे शॉपींग सेंटर व नविन शाळा इमारत बांधकाम करणे यासाठी २ कोटी ४९ लाख,घोडके प्लॉट येथे कांबळे ते सांगळे रस्ता डांबरीकरण व एक बाजुस आरसीसी गटार करणे यासाठी ४ लाख ६० हजार,घोडके प्लॉट येथे कुंभार ते कांबळे रस्ता डांबरीकरण करणे यासाठी ८ लाख ७८ हजार,घोडके प्लॉट येथे बनसोडे ते सोमाणी कंपाऊंड रस्ता डांबरीकरण व आरसीसी गटार करणे यासाठी ९ लाख ६० हजार,घोडके प्लॉट येथे कापसे ते भगवंत ॲक्वा रस्ता डांबरीकरण करणे यासाठी ८ लाख ७८ हजार,घोडके प्लॉट येथे घोडके ते गावसाने रस्ता डांबरीकरण व एक बाजु आरसीसी गटार करणे यासाठी ९ लाख ७४ हजार,घोडके प्लॉट येथे मन्मथ किराणा ते घोडके रस्ता डांबरीकरण व आरसीसी गटार करणे यासाठी ९ लाख ९९ हजार,घोडके प्लॉट येथे सोनवणे ते आतकरे रस्ता डांबरीकरण व आरसीसी गटार करणे यासाठी ९ लाख ९७ हजार रुपये मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.बार्शी शहरात सध्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विविध प्रकारची अनेक विकास कामे सुरू आहेत, काही कामे पूर्ण झाली आहेत.बार्शी शहरवासीयांना नगर परिषद व आमदार निधीच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या प्राथमिक गरजा, सोयी सुविधा,त्यांचे नागरी मुलभूत हक्क, कामांच्या अपेक्षा पूर्ण होत असल्यामुळे ते अतिशय समाधानी व आनंदी होत आहेत. यावेळी बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण,माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,माजी नगरसेवक विलास (आप्पा) रेणके, उद्योजक सुधीर (बापू) बारबोले, माजी नगरसेवक अमोल चव्हाण, माजी नगरसेवक नवनाथ चांदणे, श्रीधर कांबळे, नगर अभियंता अजय होनखांबे तसेच प्रभागातील इतर प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.