छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाचे लवकरच अत्याधुनिक बसपोर्टमध्ये रूपांतर ! पुढील तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया राबविणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

B1न्यूज मराठी नेटवर्क500

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची नवी दिशा देण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाचे लवकरच अत्याधुनिक बसपोर्टमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढील तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.500

मंत्री सरनाईक यांनी आज छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, सन १९७८ मध्ये उभारण्यात आलेले सध्याचे बसस्थानक कालांतराने अत्यंत जीर्ण झाले आहे. प्रवाशांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या बसस्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीची दखल घेत बसस्थानकाच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे.500गुजरातमधील अत्याधुनिक बसपोर्टच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरमध्येही आधुनिक बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. या बसपोर्टमध्ये प्रवाशांना आरामदायी प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, सुसज्ज फलाट आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल.

छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे महत्त्वाचे केंद्र असून, येथील बसस्थानकाचा विकास शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी उभारी देणारा ठरेल. आधुनिक बसपोर्टच्या उभारणीमुळे एसटीच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण होण्यासोबतच प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button