प्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

शेतकरी संघटनांच्या मागण्यांबाबत साखर कारखानदारांना प्रशासनाकडून सूचना

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, दि. 2 : ऊस गाळप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दरासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. या निवेदनातील मागण्यांबाबत जिल्ह्यातील संबंधित सर्व साखर कारखानदारांना अवगत करण्यात आले असून, पुढील तीन दिवसांत योग्य तो ऊस दर जाहीर करण्याबाबत प्रशासनाने सूचना केल्या आहेत.

शेतकरी संघटनांनी मांडलेल्या मागण्यांची प्रशासनाने दखल घेतली असून, त्या संबंधित साखर कारखानदारांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पुढील तीन दिवसांत योग्य ऊस दर जाहीर करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.500या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रादेशिक सहसंचालक (साखर) किरण गायकवाड, प्रादेशिक उपसंचालक (साखर) नानासाहेब रुपनवर, विशेष लेखापरीक्षक बी. सी. पवार, विष्णू डोके, संतोष मानूरकर यांच्यासह ऊस नियंत्रण मंडळाचे सुहास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे, रयत क्रांती संघटनेचे नामदेव पवार, डिजीटल शेतकरी संघटना मोहोळचे अनिल आबाजी पाटील व महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना मोहोळचे प्रभाकर उर्फ दिनकर भैया देशमुख आदी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button