उद्घाटनमहाराष्ट्रवर्धा

मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क प्रकल्पात स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सिंदी रेल्वे येथे मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्कचे भूमीपूजन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

वर्धा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकलद्वारा उभारण्यात येत असलेल्या मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून थेट विदेशात निर्यातीला चालना मिळेल. सोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सिंदी रेल्वे येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड -एनएचएलएमएल या स्पेशल पर्पज व्हेईकल द्वारा AMARA TRANZ सोल्यूशन या कंपनी मार्फत प्रकल्प उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे आज भूमीपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी, माजी खासदार रामदास तडस, सिंदी रेल्वेच्या नगराध्यक्ष राणी कलोडे, सुधीर दिवे आदी उपस्थित होते.500विदर्भातील कापूस, रुई, सुत, संत्रा, भाजीपाला यासारख्या मालाला मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून थेट विदेशात निर्यातीला चालना मिळणार आहे. विदर्भातील मुंबई- कोलंबो – ढाका मार्गे जाणाऱ्या वाहतुकीच्या वेळेत बचत होईल. या प्रकल्पातून पहिली मारोती कारची रॅक सुरु झाली आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

सिंदी रेल्वे स्टेशनजवळ 150 एकर क्षेत्रात हा प्रकल्प नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणसह संयुक्तपणे विकसित करत आहे. सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील कापूस, कापसाची रुई, कपडा, संत्रा मुंबईला न जाता कलकत्त्याच्या हल्दीया मार्गे थेट बांग्लादेशला जातील. यामुळे प्रति कंटेनर दीड लाख रुपये असलेला वाहतूक खर्च हा एक लाख रुपयावर येईल. याचा विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

राज्य व केद्र शासनाच्या तरतुदीने नागपूर- वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बांधल्या जाणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कला सिंदी रेल्वेच्या ड्रायपोर्टला जोडून येथे कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस या सुविधा निर्माण करून वर्धा आणि नागपूर शहरातील मोठमोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे जे निर्यातक आहेत त्यांचे क्लस्टर येथे तयार करण्यात येईल. सिंदी येथे कस्टमचे देखील कार्यालय राहणार असल्यामुळे देश-विदेशातील कंटेनर या ठिकाणी येणार आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button