छत्रपती संभाजीनगरमदतमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला धनादेश सुपूर्द

B1न्यूज मराठी नेटवर्क500

छत्रपती संभाजीनगर : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राज्यपाल बागडे यांनी आपल्या एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.500याप्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार सुहास शिरसाट, आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर, माजी खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. आदी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button