नांदेडमहाराष्ट्र

जलसंवर्धनाचा संदेश देत 750 हून अधिक नांदेडकरांची धाव ! ‘झेनिथ मॅरेथॉन 2026’ उत्साहात संपन्न; विजेत्यांना 50 हजार रुपयांची पारितोषिके

B1न्यूज मराठी नेटवर्क500

नांदेड : ‘थेंब थेंब महत्त्वाचा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ हा जलसंवर्धनाचा संदेश देत श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी येथे आयोजित ‘झेनिथ मॅरेथॉन 2026’ उत्साहात संपन्न झाली. संस्थेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवांतर्गत ‘टीम झेनिथ’च्या वतीने आयोजित या 5 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत 750 हून अधिक नागरिक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मॅरेथॉनचा प्रारंभ सकाळी 6 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय येथून संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. शिवाजीनगर, आयटीआय कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर आणि आनंदनगर मार्गे धावपटूंचा प्रवास नागार्जुना हॉटेल येथे संपन्न झाला. संपूर्ण मार्गावर उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.

आरोग्य जागृतीसोबत जलसंवर्धनाचा संदेश पारितोषिक वितरण समारंभात बोलताना संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे म्हणाले की, मॅरेथॉनच्या आयोजनामागे नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच महाराष्ट्र व मराठवाड्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविणे हे प्रमुख उद्देश होते. निरोगी शरीरामुळे सकारात्मक विचारांना चालना मिळते. विद्यार्थ्यांनी केवळ तंत्रज्ञानाचे शिक्षण न घेता सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीवही जोपासली पाहिजे. या उपक्रमातून निर्माण झालेली जागरूकता जलसंवर्धनाच्या व्यापक चळवळीला प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.500पुरुष व महिला गटातील विजेते मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण 50 हजार रुपयांची रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. पुरुष गटामध्ये प्रथम : ईश्वर झिरवाळ, द्वितीय : ऋषिकेश वावरे, तृतीय : दाजी हुबाळे तर महिला गटामध्ये प्रथम : प्रणाली शेगावकर, द्वितीय : परिमला बाळासाहेब बाबर, तृतीय : श्रद्धा मुंडेकर यांचा समावेश आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना आकर्षक टी-शर्ट आणि ई-प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी नांदेड जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी, पंच ज्ञानेश्वर सोनसळे, कांचन मस्के आणि वैभव अंभोरे यांनी सहकार्य केले. संस्थेचे विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. माधव वैद्य, झेनिथ शिक्षक समन्वयक डॉ. ललित टोके, शिक्षक सहसमन्वयक डॉ. दीपक वाघरे, डॉ. प्रशांत देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख भास्कर कदम, झेनिथ विद्यार्थी समन्वयक अमर्जा ढेपे, मॅरेथॉन विद्यार्थी समन्वयक कंवलप्रीतसिंघ संधू आणि झेनिथ टीमच्या सर्व विद्यार्थी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शहर पोलीस दल, वाहतूक शाखा, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे मॅरेथॉन सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पोळ, सदस्य संजय लाटकर, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, प्रा. विक्रम गद्रे, बाबा सुखविंदर सिंगजी, अमोल महामुनी, मनोज देशमुख, सुरेश जोंधळे, डॉ. अभिजीत नांदेडकर, डॉ. जयश्री वाघमारे आणि संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button