उद्घाटनकोल्हापूरमहाराष्ट्र

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वाहन हस्तांतरण व बास्केटबॉल मैदान अनावरण सोहळा संपन्न

जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल
-पालकमंत्री प्रकाश आबिटकर

B1न्यूज मराठी नेटवर्क500

कोल्हापूर : पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासह गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या ४५ वाहनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा अधिक गतिमान व सक्षम होईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास प्राप्त वाहनांचा हस्तांतरण सोहळा आणि शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचा अनावरण सोहळा जिल्हा पोलीस मैदान येथे संपन्न झाला. याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी जिल्ह्याच्या विकासाला योग्य पध्दतीने खर्च व्हावा, हा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा उद्देश आहे. पोलीस दल अधिक गतिमान करण्यासाठी सक्षम वाहनव्यवस्था आवश्यक असून, नव्याने खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी निश्चितच होईल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे काम केल्यास विकासाची अधिक चांगली कामे करता येतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. जिल्ह्यातील नागरिकांना घरांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर मार्ग निघणार आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि भूमी अभिलेख विभागासाठी मोजणीकरिता आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठीही या निधीचा उपयोग होत आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी प्रभावीपणे खर्च होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.500प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले की, जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत व सक्षम करण्याासाठी तसेच नागरिकांच्या सेवेत अधिक तत्परतेने जाण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २ इनोव्हा हायक्रॉस, १ टाटा सफारी, २० महिंद्रा स्कॉर्पीओ (विविध प्रकारातील), २० महिंद्रा बोलेरो, १ टाटा वॉटर टॅंकर व १ वज्र वाहन अशी एकूण ४५ वाहने कोल्हापूर पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. कोल्हापूर जिल्हा हा धार्मिक, पर्यटन, औद्योगिक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा जिल्हा आहे. या जिल्ह्यात विविध उत्सव, व्हीआयपी दौरा, कायदा व सुव्यवस्थेचे प्रसंग, वाहतूक व्यवस्थापन, गुन्हेगारी नियंत्रण या सर्व बाबींवर पोलीस दलास २४ तास सतर्क रहावे लागतात. अशा वेळी पोलीस दलाची जबाबदारी अत्यंत महत्वाची असते. या करीता पोलीस दलास हे वाहन उपलब्ध करुन दिले आहे. यापूर्वीही पोलीस दलास २९ वाहने उपलब्ध करुन देण्यात आली होती. उपलब्ध करुन दिलेल्या वाहनाच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन वाहनांच्या चाव्या पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आल्या. या वाहनांच्या हस्तांतरणा सोबतच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी उभारण्यात आलेल्या शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे अनावरणही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button