बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

डॉ. राहुल पालके यांचे उल्लेखनीय यश: इंग्रजी, मराठी व हिंदी तिन्ही विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण

हिंदीत ए प्लस ग्रेडसह ७७.१४ % गुण; नऊ विषयांत नेट-सेट- गेट उत्तीर्ण

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील इंग्रजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राहुल भगवान पालके यांनी इंग्रजी, मराठी व हिंदी या तिन्ही विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून तिन्ही विषयांत ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. हिंदी विषयात जून २०२६ च्या परीक्षेत ए प्लस (A+) ग्रेड मिळवून ७७.१४ % गुण प्राप्त केले आहेत.

याशिवाय त्यांनी इंग्रजी व मराठी या विषयांत सेट (SET) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच स्त्री अभ्यास, अर्थशास्त्र या व्यतिरिक्त तुलनात्मक अभ्यास, भाषाशास्त्र, आदिवासी भाषा व साहित्य आणि लोकसाहित्य या भाषा-साहित्य विषयांतूनही त्यांनी नेट परीक्षेत यश मिळवले आहे. एकाच वेळी इतक्या विविध विषयांत मिळवलेले हे यश अत्यंत दुर्मिळ मानले जात आहे.

डॉ. पालके हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. यापूर्वीही त्यांनी नेट, सेट व गेट या स्पर्धात्मक शैक्षणिक परीक्षा विविध विषयांत अनेकदा उत्तीर्ण केल्या आहेत.500डॉ. पालके हे विद्यापीठ तसेच परिसरातील विविध महाविद्यालयांमार्फत आयोजित नेट/सेट मार्गदर्शन कार्यशाळांमध्ये साधन व्यक्ती (Resource Person) म्हणून कार्यरत असतात. कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, बार्शी यांच्या माध्यमातून नेट, सेट, एमपीएससी व महा टीईटी परीक्षांच्या तयारीसाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
आपल्या बहुभाषिक ज्ञानाचा उपयोग संशोधन कार्यात तसेच विविध भाषा विकास उपक्रमांमध्ये करण्याची त्यांची इच्छा आहे. ते स्वतः कवी असून यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक लाभ होईल असे ते म्हणाले. त्यांच्या या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे भाषा व साहित्याच्या तुलनात्मक अध्ययनाला निश्चितच बळ मिळेल.

त्यांच्या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव ए पी देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, प्रा. समाधान पवार, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी व हितचिंतक यांनी डॉ. पालके यांचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button