जयंतीबार्शीरक्तदान

गुळपोळी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथील भिमरत्न ग्रुप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबारांचे आयोजित केले होते. रक्तदान श्रेष्ठ दान आहे. कारण एखाद्याला आपण अन्न किंवा अर्थ स्वरूपात दान दिलं तर ते काही मर्यादित काळापर्यंतच त्याच्या उपयोगाचा असतो. परंतु एखाद्याला रक्त दिले. तर त्याच्या आयुष्य भरासाठी ते रक्ताच्या स्वरूपात उपयोगी पडतो. आपल्या देशात रोज अपघात घडत असतात. त्या अपघातग्रस्तांना रक्ताची आवश्यकता असते तसेच, गरोदर मातांना प्रस्तुती दरम्यान रक्ताची गरज असते अनेक रुग्णाचे जटिल शस्त्रक्रिया दरम्यान सुद्धा रक्ताची आवश्यकता भासते.

या शिबिराचे उदघाटन पं समिती सदस्य इंद्रजीत चिकणे, संरपंच आण्णासाहेब चिकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच कैलास माळी, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चिकणे, जोतिराम शिंदे ,लक्ष्मण काशीद, समाधान चौधरी ,लखन चौधरी, नितीन चौधरी , राहुल चौधरी , रणजित चौधरी , किरण खुरंगळे, नामदेव चौधरी , विश्वास चौधरी, सुनिल चौधरी , सचिन चौधरी , बाळासाहेब चौधरी , पांडुरंग चौधरी, मोहन चौधरी , विजय चौधरी, रोहित चौधरी सुजित सुमंत , गणेश मांजरे , लगदिवे सिस्टर, फोके सिस्टर साजिदिन सय्यद , किरण जाधव, इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात एकूण 41 लोकांनी रक्तदान केले. समाधान चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भिमरत्न ग्रुप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button