वृक्षारोपणातून ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ; ‘सेवाज्योत’ बाइक रॅलीने दिला लोकसेवेचा संदेश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपण करून ‘सेवा संकल्प अभियानाचा’ उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी शिक्षण व आरोग्य समिती सभापती केदार सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्यासह पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व लोककल्याणकारी उपक्रमांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, लोकसहभाग वाढविणे, ग्रामस्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबविणे आणि विकासकामांना गती देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.500यानंतर पंचायत समिती उत्तर सोलापूर येथून ‘सेवाज्योत’ बाइक रॅलीला उत्साहात सुरुवात करण्यात आली. रॅलीने विविध मार्गाने मार्गक्रमण करत डफरीन चौक गाठला. त्यानंतर रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रंगभवन येथे करण्यात आली.

रॅलीच्या सांगतेनंतर उपस्थित मान्यवर व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि ‘सेवाज्योत’ बाइक रॅलीतून लोकसेवेचा संकल्प — या उपक्रमातून ‘सेवा संकल्प अभियानाची’ दमदार सुरुवात झाली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या