प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

गणेशोत्सव २०२६ अनुषंगाने बार्शी शहर पोलिसांची जय्यत तयारी

B1 न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात व्यापक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बार्शी शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

रूट मार्चमध्ये ५ पोलीस अधिकारी, ५२ पोलीस अंमलदार, एसआरपीएफच्या एका प्लाटूनचे २६ जवान आणि ४४ होमगार्ड सहभागी झाले होते. याच प्रमाणे गणेशोत्सव काळात बार्शी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.500गणेशोत्सव काळात शहरातील गर्दी, वाहतूक व्यवस्था, गणेश मंडळांचे कार्यक्रम, मिरवणुका आणि विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा, यासाठी विशेष सुरक्षा नियोजन करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वाहतुकीचे नियोजनही करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी व तत्सम ध्वनीप्रणालीच्या वापरावर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या आदेशांचे व ध्वनीविषयक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डीजे-डॉल्बीऐवजी ढोल, ताशा, हलगी, संबळ आणि लेझीम यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपावी, असे आवाहन बार्शी शहर पोलिसांनी केले आहे.

पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांना शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले असून बार्शी शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button