‘वंदे मातरम्’मधून स्वातंत्र्याचा गौरव आणि देशभक्तीचा जागरसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

छत्रपती संभाजीनगर, दि. 6 : ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश असून, देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारताचा स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा दिवस आहे. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाची कृतज्ञतेने आठवण करून देत राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.

‘वंदे मातरम्’ या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीत, संगीत आणि नृत्याविष्कारांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास, राष्ट्रभक्तीची प्रेरणा, विविधतेतील ऐक्य आणि भारतीय संस्कृतीचे वैभव प्रभावीपणे सादर करण्यात येणार आहे. संगीत आणि नृत्याचा सुरेल संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून रसिकांना लाभणार आहे.5000या कार्यक्रमात राहुल जेठे, मंगेश सुरडकर, प्रिया पवार आणि अमोल जेठे हे गायक देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार असून, द ब्लेझ डान्स ग्रुप देशभक्तीपर नृत्याविष्कार सादर करणार आहे. या कलावंतांच्या प्रभावी सादरीकरणातून राष्ट्रप्रेम, शौर्य आणि भारतीयत्वाची भावना अधिक दृढ होणार आहे.

देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, राष्ट्रनायकांचे योगदान आणि राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सदर कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि राष्ट्रभावनेचा जागर करण्याचे कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, युवक, सांस्कृतिकप्रेमी आणि रसिकांनी या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या