बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) ला आदिशक्ती अभियानाचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक

0

राज्य शासनाकडून जाहीर, गौडगाव द्वितीय तर श्रीपत पिंपरी तृतीय

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, ६ ऑगस्ट २०२६ : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ या वर्षासाठी आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना “आदिशक्ती पुरस्कार” जाहीर केले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय क्रमांक आदिपु-२०२५/प्र.क्र.१५ (ई-९६३८०८)/का-१० हा ३१ जुलै २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला.

राज्यातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी राज्यात २०२५-२६ पासून आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय असे पुरस्कार देण्याची घोषणा शासनाने केली आहे.500या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आदिशक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आरोग्य शिबिरे, महिला बचत गटांचे बळकटीकरण, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष मोहीम आणि अंगणवाडी सक्षमीकरण या क्षेत्रात जामगाव (आ) ने केलेल्या कामाची विशेष नोंद घेण्यात आली.

द्वितीय क्रमांक गौडगाव ग्रामपंचायतीला तर तृतीय क्रमांक श्रीपत पिंपरी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. या दोन्ही गावांनीही महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण, स्वच्छता अभियान आणि कुपोषण निर्मूलनासाठी राबविलेल्या उपक्रमांमुळे ही कामगिरी केली आहे.

आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या प्रस्तावानुसार ही निवड करण्यात आली असून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात येणार आहे. विजेत्या ग्रामपंचायतींना प्रमाणपत्रासह मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनाही आदिशक्ती अभियान अधिक जोमाने राबविण्यास प्रेरणा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या