दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बारामती, दि. २२ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग, पुणे यांच्यावतीने ‘हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत तालुक्यात साडेसात हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला; त्याचा शुभांरभ अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस उपमुख्यालय बऱ्हाणपूर येथे करण्यात आला.500या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाचा सामना करणे आणि तालुक्यातील हरित क्षेत्र वाढवणे हा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्ते, बांधकाम स्थळे, महामार्गाकडेच्या जागा, सरकारी इमारतींचा परिसरात आणि उपलब्ध खुल्या जागी ही झाडे लावण्यात आली.5000यावेळी कार्यकारी अभियंता अमोल पवार यांनी सांगितले, बारामती तालुक्यात 7 हजार 500 झाडांच्या लागवडीद्वारे हरित महाराष्ट्राच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये देशी प्रजाती जसे कडूनींब, पिंपळ, वड, करंज, शिसम, बाभूळ, आंबा, जांभूळ इत्यादी झाडे लावण्यात आली आहेत. या उपक्रमाद्वारे झाडे लावण्यासोबतच त्यांचे संरक्षण आणि देखभाल यासाठी देखील यंत्रणा उभारण्यात आली आहे. कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या