उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन

0

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्थेची पाहणी; मंदिर जतन कामाचा आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पंढरपूर, दि. १९ : आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. भाविकांची दर्शन रांगेत मोठी गर्दी असून त्यांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः मुखदर्शन घेऊन व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले.500सत्कार व कामांचा आढावा: मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. गृहराज्यमंत्री योगेश कदम व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचाही मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सत्कार केला.

यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची तसेच प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन, संवर्धन व नवीन दर्शन मंडपाच्या कामाबाबतची सविस्तर माहिती दिली.500यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर बाबत नागरिकांशी चर्चा केली. व विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्षा प्रणिती भालके, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम आदी उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या