कवितादिनबार्शीमहाराष्ट्र

प्रा.डॉ.राहुल पालके यांचे छत्रपती संभाजी राज्याभिषेक दिनानिमित्त कवितेचे सादरीकरण

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा स्वराज्याची धुरा शौर्याने सांभाळली. त्यांचे कर्तृत्व व शौर्य अद्वितीय होते.अगदी लहान वयातच त्यांची विद्वत्ता व भाषेची कमाल वाखाणण्याजोगी होती.छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव प्रा. डॉ. राहुल पालके यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या कवितेतून प्रस्तुत केला आहे.

१६ जून रोजी संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांनी कवितेचे प्रस्तुतीकरण करून उपस्थितांमध्ये शौर्याचे व साहसाचे दर्शन घडविले. मशाल पेटविते धरती आणि आकाश अन्यायाचा बिमोड करण्यास सरसावले सेनानी शंभू महाराज या त्यांच्या काव्यपंक्ती छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्याचा परिचय करून देतात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांनी कार्यकर्तृत्वाला सलामी दिली.

याप्रसंगी त्यांनी सह्याद्रीच्या शिलेदारांची कवितेतून ओळख करून दिली.महाराष्ट्राच्या त्यागी व शौर्यशाली परंपरेचा आपल्याला अभिमान आहे असाही विचार त्यांनी मांडला. अन्यायाविरुद्ध लढताना जीवाचे समर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. युवकांनी त्यांच्या कार्याचा ध्यास घेऊन व त्यांच्या शौर्याचे स्मरण करून जीवनातीत आव्हानांना सामोरे गेले पाहिजे असा आत्मविश्वास त्यांनी कवितेतून जागृत झाला.

इतिहासातून धडा घ्यायचा असतो. हिस्ट्री इज द मास्टर ऑफ ससायटी असा विचार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची आठवण करून देवून त्यांनी इतिहासातील थोरांचे व त्यांच्या कार्याला स्मरून कार्यप्रवण व्हावे असा विचार मांडला.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button