नगर विकास विभाग, सोलापूर क्रीडा स्पर्धाते आणि सांस्कृतिक कार्यक्रमत बार्शी नगरपरिषदेचे घवघवीत यश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नगर विकास विभाग सोलापूर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम 2024 – 25 अंतर्गत बार्शी नगर परिषदेच्या खालील कर्मचारी यांनी विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. त्याबाबत त्यांचा प्रशस्तीपत्रक व मेडल देऊन जिल्हा सह आयुक्त, सोलापूर श्रीमती वीणा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्व कर्मचारी यांना मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी सर्व कर्मचारी यांना मौल्यवान साथ देऊन सर्व स्पर्धेसाठी स्वतः उपस्थित राहून अभिनंदन केले.

स्पर्धेमधील विजेते खालीलप्रमाणे :
1) नाटिका : द्वितीय क्रमांक रवींद्र वाघमारे, तृतीय क्रमांक : प्रकाश लंकेश्वर

2) बॅडमिंटन दुहेरी पुरुष : तृतीय क्रमांक योगेश कारंजकर, सागर नान्नजकर

बॅडमिंटन दुहेरी महिला द्वितीय क्रमांक अंकिता एकबोटे, सलोनी बनसोडे

3) समूह गायन : प्रथम क्रमांक संतोष कांबळे व प्रकाश लंकेश्वर

4) वैयक्तिक गायन :- तृतीय क्रमांक प्रकाश लंकेश्वर

5) कॅरम महिला स्पर्धा : प्रथम क्रमांक सलोनी बनसोडे व द्वितीय क्रमांक अंकिता एकबोटे

6) रांगोळी स्पर्धा : प्रथम क्रमांक अंकिता एकबोटे

7) फ्री स्टाईल स्विमिंग : महिला प्रथम क्रमांक प्राणवी बोराडे

8) तीन किलोमीटर चालणे महिला : अपेक्षा घुगे द्वितीय क्रमांक

9) 100 मीटर धावणे महिला : प्रथम क्रमांक सलोनी बनसोडे

10) बुद्धिबळ महिला : तृतीय क्रमांक सलोनी बनसोडे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या