जयंतीबार्शी

नालंदा संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज व संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज व संत रोहिदास महाराज यांची जयंती नालंदा बहुद्देशीय सामाजिक संस्था, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, धम्म सहारा ग्रुप व पुरोगामी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर, संत गाडगे महाराज संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बार्शी तालुक्यातील गणेश कदम, प्रा. जे. टी. जाधव, पत्रकार धिरज शेळके, नागनाथ सोनवणे, संदीप बोकेफोडे, रविकिरण मोहिते, माकरोज बोकेफोडे, नितीशा कांबळे, जिज्ञासा कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ओन्ली समाजसेवा संघटनेच्या वतीने नालंदा बुद्ध विहार साठी एक फॅन भेट देण्यात आला. तर पत्रकार अंबादास शिंदे यांच्या वतीने उपस्थित महिलांना बौद्ध पूजा पाठ पुस्तकाचे वाटप करून ऍड. सूरज खुणे यांच्या वतीने उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रम नालंदा बुद्ध विहार बार्शी याठिकाणी संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button