क्रीडा विषयकदेश-विदेशमहाराष्ट्र

विजयाची हॅटट्रिक, न्यूझीलंडचा ४४ धावांनी केला पराभव , वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स

B1न्यूज मराठी नेटवर्क

दुबई : श्रेयस अय्यरची ७९ धावांची खेळी, वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स व फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी या जोरावर भारताने न्यूझीलंडला नमवत ४४ धावांनी मोठा विजय नोंदवला. भारताच्या फिरकीपटू चौकडीने ९ विकेट्स घेत किवीच्या धावांना वेसण घातलं. या विजयासह भारताने गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवला जाणार आहे.

कर्णधार केन विल्यमसनने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताविरुद्ध संयमी आणि महत्त्वपूर्ण 81 धावांची खेळी केली. मात्र, अक्षर पटेलच्या चतुराईने टाकलेल्या चेंडूवर तो केएल राहुलकडे स्टंपिंग झाला. त्याने 120 चेंडूंमध्ये 7 चौकारांसह ही खेळी केली, पण त्याचा स्ट्राइक रेट फक्त 68 चा राहिला. न्यूझीलंडसाठी त्याची ही खेळी महत्त्वाची ठरली असली, तरी 41 षटकांत 169-7 अशी त्यांची नाजूक स्थिती आहे.

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी २ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या गट सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. उपांत्य फेरीतील ४ संघ आधीच ठरले होते पण आता कोणता संघ कोणत्या संघाविरूद्ध खेळणार हे निश्चित होणं बाकी होत आणि ते भारत-न्यूझीलंड सामन्याच्या निकालावर ठरणार होते. यासह आता उपांत्य फेरीचे संघ ठरले असून भारत वि. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका हे संघ असणार आहेत.

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील तिसरी नाणेफेक गमावली पण सलग तिसरा सामना मात्र जिंकला आहे. नाणेफेक गमावत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता आणि भारताची सुरूवात खूपच खराब झाली. भारताने ३० धावांमध्ये ३ विकेट गमावले होते. यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलच्या साथीने ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यरने ७९ धावांची तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकरून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेत भारताला जास्त धावा करण्याची संधी दिली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button