‘राजा शिवाजी’च्या यशासाठी रितेश-जेनेलिया देशमुख तुळजाभवानीच्या चरणी लीन!

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

तुळजापूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज देशभरात प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित चित्रपटाच्या यशासाठी अभिनेते-दिग्दर्शक रितेश देशमुख आणि निर्माती-अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.5000छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या भव्य चित्रपटाच्या निमित्ताने देशमुख दांपत्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद मागितले. रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी मंदिरात जाऊन श्री तुळजाभवानी देवीची विधीवत आरती केली. तसेच, अतिशय भक्तीभावाने आणि पारंपरिक पद्धतीने त्यांनी कुलधर्म व कुलाचार पार पाडले.5000श्री तुळजाभवानी माता ही साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी मानली जाते. त्यामुळे शिवरायांच्या चरित्रावर आधारित असलेल्या या चित्रपटाला देवीचा आशीर्वाद मिळावा, या विशेष श्रद्धेने त्यांनी हे दर्शन घेतले.5009१ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मंगल मुहूर्तावर ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख यांनी केले असून, निर्मितीची धुरा जेनेलिया देशमुख यांनी सांभाळली आहे. शिवरायांचा गौरवशाली इतिहास आणि शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर उलगडणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या